पुणे : लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने विशेष सवलत योजना जाहीर केली असून, ग्राहकांचा तिला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता योजनेचे शेवटचे काही दिवस राहिले असून, येत्या २ जूनपर्यंतच ही योजना सुरू राहणार आहे.
या योजनेअंतर्गत सोन्याचे नेकलेस, बांगड्या आणि चेनच्या मजुरीवर १० ते ३० टक्के सवलत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांतील २९ दालनांतून ही विशेष सवलत योजना राबवण्यात येत आहे.
‘लग्नसराईत ग्राहकांचा दागिने खरेदीचा आनंद द्विगुणित व्हावा या हेतूने ही विशेष सवलत योजना जाहीर केली आहे,’असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.